esakal | सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती - फडणवीस
sakal

बोलून बातमी शोधा

fadnavis

'सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केलेत, सहकार क्षेत्र (cooperative sector) बुडविले त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. मात्र, ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचे स्वागतच केला आहे. अमित शाह खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) म्हणाले. सध्या केंद्रातील सहकार खातं हे गृहमंत्री अमित शाह (home minister amit shah) यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्याबाबतच आज ते नागपुरात बोलत होते. (devendra fadnavis commented on cooperative sector)

हेही वाचा: संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना मंत्र्याचं सूचक विधान

फडणवीसांनी यावेळी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहे. मात्र, पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे, अशी अपेक्षा आहे. जर आघाडीच्या तीन पक्षामध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत राहिले असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती, असेही ते म्हणाले. तसेच काही महिन्यातच होणार असलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केले. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागलो असून आमच्या नगरसेवकांनी कोविडच्या काळात चांगले काम केले, असेही ते म्हणाले.

फक्त 18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपाबद्दल निर्देश द्यावे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे, त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले असल्याचं सूचक विधान देखील त्यांनी केलं.

loading image