esakal | संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना मंत्र्याचं सूचक विधान
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay rathod

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात? शिवसेना मंत्र्याचं सूचक विधान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : संजय राठोड (sanjay rathod) यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी (puja chavan suicide case) वन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांचीच पुन्हा मंत्रिमंडळात वापसी होण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेना मंत्री उदय सामंत (minister uday samant) यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे संजय राठोड हे पुन्हा मंत्री होणार का? यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (sanjay rathod may returned in maharashtra cabinet says uday samant)

हेही वाचा: Video : 'हेच आमचे देव', बार मालकाने केली वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संजय राठोड हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली. त्यानंतर त्यांना राठोडांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सूचक विधान केलं. त्यांची कार्यपद्धती पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता राठोड पुन्हा मंत्रिमंडळात येणार का? अशी चर्चा रंगली आहे.

गेल्या ८ फेब्रुवारीला पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुण्यातील एका सोसायटीमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर पुजाच्या ऑडिओ क्लीप देखील व्हायरल झाल्या होत्या. त्यात संजय राठोड यांचे नाव असल्याची चर्चा होती. त्यावेळी राठोडांनी देखील चुप्पी साधली होती. मात्र, एक दोन दिवसाआड पुजाच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे विरोधक भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीवर चांगलाच हल्लाबोल चढवला. शेवटी संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा त्यांना सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

अद्यापही वनमंत्री पद खालीच -

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वनमंत्री पद अद्यापही खालीच आहे. हे मंत्रिपद दुसऱ्या कुठल्या आमदाराला देण्याबाबत अद्याप शिवसेनेकडून कुठलंही वक्तव्य करण्यात आलं नाही. आता उदय सामंत यांच्या संकेतानुसार जर मंत्रिमंडळात संजय राठोड यांची वर्णी लागली तर त्यांना वनमंत्री पदच देण्यात येईल का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

चंद्रकांत पाटील आक्रमक -

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात येतील, अशी चर्चा रंगताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चर्चेत आलेले माजी मंत्री संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराच त्यांनी राज्य शासनाला दिला आहे.

loading image