Fadnavis Vs Thackeray: कलंकीचा कावीळ! फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी नागपूर इथं बोलताना फडणवीसांवर सडकून टीका केली होती.
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis sakal

नागपूरमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांना "नागपूरचा कलंक' असं संबोधलं होतं. त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत फडणवीसांनी ठाकरेंना 'कलंकीचा कावीळ' असं संबोधलं आहे. (Devendra Fadnavis counter attack on Uddhav Thackeray over Kalank statement)

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Rahul Narvekar: मूळ पक्षाची खात्री होत नाहीए, त्यामुळं व्हिपचा निर्णय घेणं अवघड - नार्वेकर

फडणवीसांनी ट्विट करताना, कलंकीचा काविळ असा मथला देताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेल्या ठाकरेंना आठ वाक्यांतून निशाणा साधला आहे. तसेच यापूर्वी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकांच्या व्हिडिओ क्लीप्स समोर आणल्या आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis
Tobacco: सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूचा तोबरा भराल तर सावधान! आला 'हा' नवा आदेश

फडणवीसांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

2) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना केलेलं जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

3) सकाळ, दुपार, संध्याकाळ सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

4) सकाळी सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या रात्री गळ्यात गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना वसुलीला लावणं, याला म्हणतात कलंक!

6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का? असे विचारणे, याला म्हणतात कलंक!

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!

8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा कावीळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

उद्धव ठाकरेंनी केली होती सडकून टीका

नागपूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर कडाडून टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "फडणवीसांची हालत सध्या अशी विचित्र झालेली आहे की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, असा उल्लेख करताना ठाकरेंनी फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप उपस्थितांना ऐकवली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही, असं ते म्हणाले होते. यावर "अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com