esakal | ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच प्रार्थना, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

'ED ची पिडा लागेल असं वर्तन करू नका हीच प्रार्थना'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : जयंतरावांच्या मागे ईडीची पिडा लागू नये. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कोणाच्याच मागे पिडा लागू नये. ईडीची पिडा लागू नये असं कोणीच वर्तन करू नये हीच आज गणेशचरणी प्रार्थना आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. आज त्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांना (minister jayant patil) टोला लगावला. जयंत पाटलांनी ईडीची पिडा लागली, असे वक्तव्य केले होते. त्यालाच फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

हेही वाचा: देशातील बारा प्रसिद्ध गणपती मंदिरं पाहिलीत?

देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशावर कोरोनाचं संकट आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना आहे. त्यामुळे कोरोनाचं हे संकट गणपती बाप्पाने दूर कारावे. तसेच महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची शक्ती शेतकऱ्यांना द्यावी. सर्वांना गणपतीने सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना गणेश चरणी केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. त्यावर उदरनिर्वाह करणारे हजारो लोक आहेत. पुजारी, सेवक, बेल-फुलं विकणारे अनेक लोक आहेत. राज्यात मदिरालय सुरू होऊ शकते, तर मंदिरं का नाही? सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रात बंद आहेत. त्यासाठी गणपती बाप्पा राज्य सरकारला सुबुद्धी देवो, असेही फडणवीस म्हणाले.

काँग्रेस ही जुन्या पुण्याईवर जगतेय. मालगुजारी तर गेलीय, आता उरलेल्या मालावर गुजराण चाललीय, अशी वऱ्हाडी म्हण आहे. ती काँग्रेसला चपलख लागू होते, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी देखील माध्यमांशी संवाध साधला. यावेळी त्यांनी सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ देत असं मागणं बाप्पाला मागितलं.

loading image
go to top