'राहुल गांधी एक ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?', फडणवीसांचा सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांना आणि कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनाही धारेवर धरले

'राहुल गांधी ट्विट करतात अन् लगेच महाराष्ट्रात मोर्चा कसा निघतो?'

अलीकडे राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये झालेल्या दंगलीवरून राजकीय वर्तुळात एकमेकांवर टीका सुरु आहेत. या जिल्ह्यात मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले. त्रिपुरामध्ये मशिदीची नासधूस करण्यात आली, असा दावा करत हे मोर्चे निघाले. या मोर्चात जाळपोळ आणि वित्तहाना झाली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षांना आणि कॉंग्रेसच्या राहुल गांधी यांनाही धारेवर धरले आहे. आज ते मुंबई येथे बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही : फडणवीस

ते म्हणाले, राहुल गांधी ८ नोव्हेंबरला ट्विट करतात अन् ११ नोव्हेंबरला मोर्चा कसा निघतो? त्रिपुरामध्ये अत्याचार होत असल्याचं ट्विट ८ नोव्हेंबरला राहुल गांधी यांनी केल होतं. पुढच्या दोन-तीन दिवसांतच ११ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेडमध्ये मोर्चे निघतात. कोणाच्याही ध्यानी मनी नसताना हजारो लोक मोर्चा कसा काय काढतात? कोणतंच नियोजन न करता मोर्चा कसं काय काढू शकतात. नियोजन झालं तर सरकारला माहिती नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनता आता बेजार आहे. कुणी राज्य म्हणून जनतेचा विचार करत नाही, समस्यांचा विचार करत नाही, असेही ते म्हणाले आहेत. निवडून निवडून हिंदुंची दुकान तोडली, जाळली. त्यावर कोणी बोललं का? ज्यावेळी हिंदुंची दुकानं जाळली गेली, त्यावर महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का? असा सवाल ही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा: हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र फडणवीस

loading image
go to top