हिंदुंची दुकान तोडली, जाळली. त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र फडणवीस | Devendra fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र फडणवीस

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अलीकडेच राज्यात अमरावती, (Amravati) नांदेड आणि मालेगावमध्ये (Malegaon) मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये मशिदीची (Tripura mosque) नासधूस करण्यात आली, असा दावा करुन हे मोर्चे निघाले होते. या मोर्चांमध्ये हिंसाचार झाला होता. त्याचवरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fanavis) यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. "अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये जे घडलं, ती साधी घटना नाही. हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे. देशात अराजक तयार करण्याचा प्रयत्न आहे. हा विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार झाले. त्रिपुरात रॅली निघाली. त्यात कुठलीही हिंसा होत नाही. पण २८ ऑक्टोबरला टि्वटर, फेसबुक, Whatsapp वर काही पोस्ट सुरु होतात" असे फडणवीस म्हणाले.

"सीपीआयच्या कार्यालयाला आग लागली, तो फोटो मशीद जाळल्याचा फोटो म्हणून दाखवला जातो. त्यानंतर दिल्लीतल्या रेफ्युजी कॅम्पला लागलेल्या आगीत काही पुस्तक जळाली. काही लोक ती पुस्तक बाहेर काढत होते. तो फोटो कुराण जाळल्याचा फोटो म्हणून दाखवला" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. "अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मोर्चे निघाले. नियोजनाशिवाय हे मोर्चे कसे निघू शकतात. मोर्चा निघाला, तर सरकार, गुप्तचर यंत्रणेला माहिती नव्हती का? हा प्रयोग आहे" असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा: फटाके फोडताना उडालेला तुकडा युवकाच्या लिव्हरमध्ये घुसला, मुंबईतील घटना

"सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले होते. हा पोलरायझेशनचा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदुंची दुकान तोडली, जाळली. त्यावर कोणी बोललं का? ज्यावेळी हिंदुंची दुकानं जाळली गेली, त्यावर महाविकास आघाडीचा एकतरी नेता बोलला का? मविआ नेत्यांची तोंड शिवली होती का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

हेही वाचा: मोदींचं विमान लँड झालेल्या 'पूर्वांचल एक्सप्रेसवे'ची खासियत

भाजपाने दंगल घडवली, असा संजय राऊत यांनी आरोप केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, "कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेडया असा कसा वाया गेलास तू." नवाब मलिक यांच्यावरही फडणवीसांनी आरोप केला. "हे षडयंत्र होतं, ते उघड होऊ नये, यासाठी कव्हर फायरिंगच काम मलिकांनी केला. मोर्चे काढण्यासाठी पैसे कुठून आले? ते नवाब मलिकांना माहित आहे" असा आरोप फडणवीसांनी केला.

loading image
go to top