मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही; फडणवीसांची ठाकरेंवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnvis

मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री समजतच नाही : फडणवीस

मुंबई: भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एकाबाजूला उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत शुभेच्छा देत त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सर्वांत प्रगतीशील राज्य असताना आज सरकार कुठेय, हा प्रश्न विचारावा लागतो आहे. एक मुख्यमंत्री आहेत, ज्यांना कोण मुख्यमंत्री समजत नाही. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. आणि महाराष्ट्रातील जनता आता बेजार आहे. कुणी राज्य म्हणून जनतेचा विचार करत नाही, समस्यांचा विचार करत नाही.

हेही वाचा: ऑनलाइन बाललैंगिक शोषण : CBI ची महाराष्ट्रासह १४ राज्यांत शोधमोहीम

पुढे ते म्हणाले की, पाच वर्षे आपलं सरकार होतं. आपल्या सरकारच्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, डिजीटल इंडिया, उद्योगीकरण यावर चर्चा करायचो. मात्र, आज यातील कुठल्याच गोष्टीवर चर्चा होत नाही. आता गांजा नव्हे तर हर्बल तंबाखूवर चर्चा होते. दंगली, खंडणी, वसूली यावर चर्चा होते. या सरकारच्या काळातील अनाचार दुराचार इतका आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून इतिहासात नोंद होईल. पुढे ते म्हणाले की, ज्याप्रकारे वसूली सुरु आहे की माजी गृहमंत्री तुरुंगात असताना प्रत्येक विभागात एक 'वाझे' आहे. सरकार सामान्यांसाठी नसून कायद्याचं राज्य नसून 'काय ते द्या'चं राज्य सध्या आहे.

नुकत्याच काही धाडी पडल्या होत्या. आयटी विभागाच्या या धाडीमध्ये कुठे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कुठे चारशे कोटीची दलाली. हजारो कोटी रुपयांची अक्षरश: वाटमारी आणि लूट चालली असून सामान्य शेतकऱ्याकेड कुणी पहायला तयार नाहीये. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे उतरवणारा प्रस्ताव मांडला आहे. यांचे कितीही कपडे काडले तरी यांना काही फार फरक पडणार नाहीये. आता या सरकारविरुद्ध आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. गेले दोन वर्षे कोरोनाचं कारण सांगून रस्त्यावर उतरणाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे. मात्र आता तसं होणार नाही.

हेही वाचा: 'शरीरात रक्त आहे, तोपर्यंत BSF जवानांना भूमीत पाय ठेऊ देणार नाही'

पुढे ते म्हणाले की, राजकारणाचं गुन्हेगारीकरण सुरु असून अक्षरश: देशद्रोह्यांसोबत पार्टनरशीप सुरु आहे. गावागावातील अवस्था अशी आहे की, अवैध रेती आणि अवैध दारूचे धंदे सुरु आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था यापूर्वी कधीही नव्हती. उद्या कुणाचंही राज्य आलं तरी महाराष्ट्र पूर्वपदावर यायला खूप कष्ट घ्यावे लागतील.

अमरावती, मालेगाव, नांदेड मधील घटना साध्या नाहीत. या घटना म्हणजे प्रयोग आहे. देशातील अल्पसंख्याकांना पोलराईज करण्याकरिता विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला बंगालमध्ये हिंदूंवर अत्याचार झाल्यावर त्रिपूरातील निषेध सभेत कसलीही हिंस होत नाही. तरीही काही अफवांच्या पोस्ट पसरवल्या जातात. मशिदी जाळल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. वेगवेगळ्या शहरात हजारो लोक एकाचवेळी मोर्चे काढू कसा शकतात? संपूर्ण सरकारच्या समर्थनांने निघालेले हे मोर्चे होते. देशातील पोलरायझेशनचा हा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदूंची दुकाने तोडली जातात. हिंदूंची दुकाने जाळली गेली तेंव्हा मविआचा एकही नेता बोलला का तेंव्हा तोंडं शिवली जातात? असा सवालही त्यांनी केला आहे.

loading image
go to top