esakal | 'पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी, सेनेला कापरं भरलंय'
sakal

बोलून बातमी शोधा

देवेंद्र फडणवीस

'पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी, सेनेला कापरं भरलंय'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला (shivsena) कापरं भरलेलं आहे. त्यांना पाणी देखील जात नाही. त्यांना जेवण देखील जात नाही, असं नाना पटोलेंच्या बोलण्यावरून दिसतंय. ते इतके का घाबरले आहेत, हे त्यांनी सांगावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते. (devendra fadnavis critized shivsena and ncp on nana patole statement)

हेही वाचा: लोकल तातडीने सुरु करा, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

काय म्हणाले नाना पटोले? -

स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असून लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केला.

सोनिया गांधी यांनी सांगितलेय आहे की, महाराष्ट्र काँग्रेसची भूमी आहे. आपल्याला तिथं सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. परंतु मला हे सुखानं जगू देणार नाहीत. त्यांच्याकडे गृहखातं आहे मुख्यमंत्रिपद आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहेत. परंतु ते त्यांच्या जवळ आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहतेय, हे त्यांना माहित आहे. आता मी इथं आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देण्याचा आदेश आहे. मी कुठं सभा घेतली, कुठले दौरे केली याची सगळी माहिती असते, असं पेटोले म्हणाले आहेत.

loading image