

Devendra Fadnavis Sanjay Raut
esakal
Sanjay Raut Latest News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच दिल्लीत बोलावून उपपंतप्रधानपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मोदींचा वारसदार म्हणून फडणवीस यांना पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या संभाव्य दिल्लीतील भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.