Devendra Fadnavis : 'आम्ही प्रचाराला गेलो ते पवारांना पटलं नाही; पण...' फडणवीसांनी काढला जुना मुद्दा

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSakal

मुंबईः कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये ठाण मांडून बसले होते. त्यावर अजित पवार यांनी खोचक टिपण्णी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. संजय राऊत प्रकरणामध्ये 'सामना'च्या उपसंपादकाने तसं बोललो नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करणं चूक असल्याचं फडणवीस म्हणाले.

अजित पवार पंढरपूरमध्ये ठाण मांडून होते- फडणवीस

आम्ही कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराला गेलो ते अजित पवार पटलं नाही. आम्ही दोन-तीन दिवसच गेलो. परंतु ते पंढरपूरमध्ये ते पूर्णवेळ बसले होते. तिकडे नांदेडमध्ये पूर्णवेळ अशोक चव्हाण बसले होते, हे त्यांना दिसलं नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले फडणवीस?

  • मविआने शेतकऱ्यांना ६ हजार दिले. आम्ही ७ महिन्यांमध्ये १२ हजार दिले.

  • एमपीएससीचा निर्णय त्यांचं सरकार असतांना झाला होता.

  • आमच्या मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन एमपीएससीकडे पाठपुरावा केला

  • छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे

  • आता महसूल विभागाला नोटिफिकेशन काढावं लागेल, ते दोन दिवसांत निघेल

  • त्यानंतर जिल्ह्याचं आणि सर्व संस्थांचं नाव बदलेल

  • तालुका, जिल्हा आणि मनपाचं नाव बदलेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com