महाराष्ट्राच्या राजकारणाचं दर्शन! फडणवीसांनी पेडणेकरांना दिली लिफ्ट

devendra fadnavis lift kishori pednekar goa to mumbai
devendra fadnavis lift kishori pednekar goa to mumbai e sakal

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून रंगलेला वाद सर्वश्रूत आहे. त्यातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही केलीय. पण, हा सर्व वाद बाजूला सारत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. गोव्यावरून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या महापौरांना फडणवीसांनी लिफ्ट दिलीय. त्यामुळे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं (Maharashtra Politics) खरं रुप असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय.

devendra fadnavis lift kishori pednekar goa to mumbai
फडणवीसांनी पेडणेकरांना दिली लिफ्ट, रुपाली ठोंबरे म्हणतात...

सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना काही जागा लढवत असल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या प्रचारासाठी गोव्याला गेल्या होत्या. पण, लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांची मुंबईला येण्याची धावपळ सुरू झाली. पण, त्यांना पणजीवरून कुठलंही विमान मिळालं नाही. तसेच देवेंद्र फडणवीस हे गोव्या निवडणुकीचे प्रभारी असल्यानं ते देखील प्रचारासाठी गोव्यात आहेत. ते त्यांच्या चार्टर प्लेनने मुंबईला रवाना होणार असल्याचे कळताच पेडणेकरांनी फडणवीसांसोबत संपर्क साधला. त्यांनी लिफ्ट देण्याची विनंती केली. त्यानंतर फडणवीसांनी विनंती मान्य करत गोव्यापासून मुंबईपर्यंत शिवसेनेच्या महापौरांनी लिफ्ट दिली. देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेनने गोव्यातून मुंबईला आले. त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर देखील याच विमानातून मुंबईत आल्यात. एकमेकांविरोधात प्रचार करणारे मंडळी एकाच विमानातून मुंबईत दाखल झाले. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com