esakal | फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
sakal

बोलून बातमी शोधा

 fadnavis amit shah meet

फडणवीस अमित शाह यांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. २८ तारखेला रात्री उशिरा फडणवीस दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी अमित शाह आणि फडणवीसांची भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मंत्री मायकल लोबो देखील उपस्थित होते. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली.

हेही वाचा: मराठवाडा : मृतांच्या नातेवाईकांना मिळणार मदत - वडेट्टीवार

देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी आहेत. त्यासाठी त्यांनी २० आणि २१ सप्टेंबरला गोव्याचा दौरा देखील केला होता. निवडणुकीच्या अनुषंगाने गोव्यातील स्थिती काय आहे? याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना माहिती दिली असून गोवा निवडणुकीची रणनिती नेमकी काय असेल? याबाबत फडणवीसांनी अमित शाह यांचे मार्गदर्शन घेतले.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. सर्व पीके पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांकडून सविस्तर माहिती घेतली, असेही फडणवीसांनी त्यांच्या ट्विटमधून सांगितले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर कारवाई होत आहे. याबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

loading image
go to top