देवेंद्र फडणवीसांचा ‘माविआ’वर हल्ला; नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis said the government has not done anything for OBC reservation

‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर...’

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपासून इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी कोणतीही धडपड करीत नाही आहे. ओबीसी आरक्षणासाठी (Obc Reservation) कोणतीही धडपड केली नाही. याउलट तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (nawab malik) हे मंत्रिमंडळात राहावे यासाठी धडपड केली जात आहे. याच्या अर्धी तरी धडपड केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर हल्ला केला. (Devendra Fadnavis said the government has not done anything for OBC reservation)

नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. नवाब मलिकचे यांचे डी-गँगशी संबंध होते. मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खान यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. डी-गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवली, असे दोषारोपपत्रात ईडीने म्हटले आहे.

हेही वाचा: बॅटरी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

यामुळे नवाब मलिक (nawab malik) यांना मोठा दणका मिळण्याची शक्यता आहे. मलिकांचे डी-गँगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने विरोधकांचे महाविकास आघाडीवरील हल्ले वाढले आहेत. नवाब मलिकांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून अट्टहास केला जात आहे. डी-गॅंगशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही हा प्रकार सुरू आहे असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

दोन वर्षांपासून सरकारने काहीही केले नाही

याच सरकारने इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी अशी धडपड केली असती तर बरं झाल असतं. ओबीसी आरक्षणासाठी (Obc Reservation) धडपड करण्याची गरज असताना मलिकांसाठी यांनी धडपड केली. याच्या अर्धी धडपड जरी केली असती तर ओबीसी आरक्षण गेले नसते. दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने काहीही केले नाही, असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Web Title: Devendra Fadnavis Nawab Malik Maha Vikas Aghadi Obc Reservation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top