शिवभक्ताचं, राष्ट्रभक्ताचं जाण्यानं न भरुन निघणारी पोकळी - देवेंद्र फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

शिवभक्ताचं, राष्ट्रभक्ताचं जाण्यानं न भरुन निघणारी पोकळी - देवेंद्र फडणवीस

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी निधन झालं. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता सर्वच क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येतेय. त्यातच राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : चालता-बोलता इतिहास

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

loading image
go to top