देवेंद्र फडणवीस चौकशी प्रकरण; राज्यभरातील भाजप नेते आक्रमक

आज याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली आहेत.
political
politicalesakal
Summary

आज याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली आहेत.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर पोलिस बदल्यांमध्ये मोठी देवघेव झाल्याचा अहवाल गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी दिला होता. यावर राज्य सरकराने कोणतीच कारवाई न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. गोपनीयतेचा भंग आणि टेलग्रॅफिक अॅक्टनुसार मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी येण्याची नोटीस पाठवली. याचा निषेध म्हणून आज भाजपाकडून (BJP) राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. नागपूर, पुणे, सांगली या जिल्ह्यात भाजप नेत्यांकडून नोटीस जाळून महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

political
फडणवीसांची पोलिसांकडून चौकशी; जबाब नोंदवण्याची प्रकिया सुरु

आज याप्रकरणी भाजपच्या नेत्यांनी राज्यभर आंदोलने केली. आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही आज सांगलीतील (Sangli) आटपाडी तालुक्यातील झरे येथे राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याविरोधात आवाज उठवला. यावेळी भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या नोटीसीचे दहन करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला आहे. हांडेवाडी चौकमध्ये (ता. हवेली) नोटीशीची होळी करून हवेली तालुक्यात भाजपच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.

दरम्यान, प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की मला प्रश्नावली पाठवली होती. मला अधिकार आहेत पण प्रश्नावली संदर्भात काही शंका असू शकतात. त्यांना पळवाट काढता आली असती. देवेंद्र फडणवीस हे निष्णात वकील आहेत. सध्याच्या परिस्थितीत कशी वाट काढायची त्या पद्धतीने काम करत आहेत. कोणत्याही मोठ्या नेत्याबद्दल असं आक्षेपार्ह वक्तव्य होऊ नये. केवळ नितेश, निलेश राणेंनी वक्तव्य केलं आहे का? तपासून पाहा मोदींविरोधात अशी वक्तव्ये केली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

political
'...तर दाऊदला महाराष्ट्रभूषण द्या, गांधींऐवजी दाऊदचा फोटो लावा'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com