आम्ही 'कागदी वाघ' नाही - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नागपूर - ‘‘भाजप म्हणजे ‘पेपर टायगर’ नव्हे, तर भाजपचा कार्यकर्ता खरा टायगर आहे,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढविला. भाजप-शिवसेनेतील मतभेद दिवसेंदिवस तीव्र होत असताना व नाणारवरून शिवसेनेने भाजपची कोंडी केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

पूर्व विदर्भातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कोराडी येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातील कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व सदस्य व पूर्व विदर्भातील आमदार उपस्थित होते. 

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘भाजप हा ‘मॅन टू मॅन’ व ‘हार्ट टू हार्ट’  संवाद साधणारा पक्ष आहे. केवळ प्रसारमाध्यमांच्या भरवशावर मोठा होणारा आमचा पक्ष नाही.  काही नेते वर्तमानपत्रात काही छापून आल्यामुळे मोठे झालेले आहेत. या त्यांच्या मताकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही. आम्ही प्रसारमाध्यमांच्या नव्हे, तर लोकांसोबतच्या संवादामुळे मोठे झालो आहोत.’’

Web Title: Devendra Fadnavis political attacked to Shiv Sena