विदर्भात आमची ताकद जास्त, बावनकुळे महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देतील : फडणवीस

भारतीय जनता पक्षानं आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे.
Chandrashekhar Bawankule 
 Devendra Fadnavis
Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavisesakal
Summary

भारतीय जनता पक्षानं आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे.

भारतीय जनता पक्षानं (BJP) आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे. त्यानुसार मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून आशिष शेलार (Ashish Shelar) तर, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आलीय.

एकनाथ शिंदे गटासोबत भाजपनं सत्ता स्थापन केली. या सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. या शपथविधीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळं रिक्त असलेल्या प्रदेशाध्यक्ष पदावर बावनकुळेंची वर्णी लागली. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केलंय.

Chandrashekhar Bawankule 
 Devendra Fadnavis
'भाजपशासित राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी महिलांना कुणासोबत तरी झोपावं लागतं'

फडणवीस म्हणाले, बावनकुळे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्षाचे कट्टर सैनिक आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व देतील, ही आशा आहे. विदर्भात आमची शक्ती जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा असून मुंबईमध्येही आम्हीच बलाढ्य आहोत. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणतही पक्ष मोठा बनला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com