"प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी.." फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची हवागुल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

"प्रतिज्ञापत्र हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी.." फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाने ठाकरे गटाची हवागुल?

खरी शिवसेना आपलीच आहे आणि पक्षाचं नाव आणि चिन्हं मिळावं आपल्याला मिळावं म्हणून ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगासमोर ट्रक भरून प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडूनही निवडणूक आयोगासमोर 11 लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्रं सादर करण्यात आली आहेत. मात्र, या प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकल्यामुळं त्यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद ठरवण्यात आली आहेत. दरम्यान, या संदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिज्ञापत्रावरून एक मोठं विधान केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, कोण कशाच्या बातम्या करतं मला माहीत नाही. परंतु, निवडणूक आयोगाकडे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्रं लागत नाहीत. एखाद्या पक्षाला मान्यता द्यायची किंवा चिन्हं द्यायचं यासाठी निवडणूक आयोगाचे नियम ठरलेले आहेत. गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी दिलेले निर्णय हे याचे प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्रं किती आहेत? कुणाचे प्रतिज्ञापत्र रद्द झाले. कुणाचे टिकले हे सर्व स्वत:च्या समाधानासाठीच चाललं आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचा: Shivsena: ठाकरे गटाला धक्का! अडीच लाख प्रतिज्ञापत्राबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

त्याचबरोबर कालपासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार होण्याची चर्चा सुरू आहे. दुपारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल असं स्पष्ट केलं. त्यानंतर फडणवीस रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, जेव्हा बातम्या नसतात तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार ही बातमी असते, असा टोला त्यांनी लगावला.