Devendra Fadnavis Responds to Rahul Gandhi's Election Allegations : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रातील मतदार यादीत गेल्या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले, असा दावा त्यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.