देवेंद्र फडणवीसांनी एसटीचे केल वाटोळं; एसटी कर्मचारी संघटना संतापल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 फडणवीसांवर एसटी कामगार संघटना संतप्त

देवेंद्र फडणवीसांनी एसटीचे केल वाटोळं; एसटी कर्मचारी संघटना संतापल्या

मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा घेऊन, कार्यालयामाच्या व्यासपीठावरून कर्मचारी संघटना आणि सरकारवर तोंडसुख घेतले होते. एसटी कर्मचारी संघटना नुसत्या सदस्य नोंदणीच्या नावावर पैसे उलकळण्याचे धंदे करत असल्याचेही ते बोलले होते. त्यानंतर आता एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करून, फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळं झाल्याची टीका केली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या अनियमित वेतन व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. दुर्देवाने एस.टी. कर्मचा-यांनी कोरोनाच्या संकट काळात काम करुन सुध्दा एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु अशा परिस्थितीत एसटी कर्मचा-यांनी धीर न सोडता संघर्ष करण्यासह परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे. तथापि, कर्मचा-यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने लवकरच संघटनांच्या वतीने भूमिका जाहिर केल्या जाणार असल्याचे या तिन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: प्राजक्ता माळीचा जमीनीचा दिवाणी दावा लोकअदालतीत निकाली

तर एसटी कर्मचा-यांच्या सध्या निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेचा भारतीय जनता पार्टीचे नेते राजकीय वापर करत आहे. फडणवीस सरकारच्या काळात एसटी महामंडळाकडे व एस.टी. कर्मचा-यांकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यानी दुर्लक्ष केले. परंतु आता केवळ राजकीय द्वेषापोटी भाजपचे आमदार गोपीपीचंद पडळकर कर्मचा-यांच्या भावनेचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने अनेक भडकाऊ व असंवैधानिक विधाने करून अपमानास्पद भाषा वापरतात. त्यामुळे भडकाऊ व असंवैधानिक विधाने करुन एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन करणा-या व एसटी कर्मचा-यांच्या भावनेचे राजकारण करणा-यांचा एसटी कर्मचारी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे, एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, तर कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी जाहिर निषेध केला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
loading image
go to top