esakal | "अजूनही मीच मुख्यमंत्री..." अखेर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

"अजूनही मीच मुख्यमंत्री..." अखेर फडणवीसांचे स्पष्टीकरण

"अजूनही मीच मुख्यमंत्री..." अखेर फडणवीसांचे स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

गोवा : अजूनही वाटते मला की मीच मुख्यमंत्री आहे, अशी ‘मन की बात’ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बेलापूर येथे आयोजित केलेल्या भाजपाच्या एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यानंतर राजकिय स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्यानंतर फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला गोव्यात दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे. काय म्हणाले नेमके देवेंद्र फडणवीस....

काय म्हणाले होते फडणवीस?

"मी जरी आता मुख्यमंत्री नसलो तरी भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मला मी मुख्यमंत्री नाही असे कधीही जाणवू दिले नाही. त्यामुळे मला असे वाटते की, मी आजही मुख्यमंत्री आहे. गेले दोन वर्षे मी एकही दिवस घरात न थांबता जनतेची सेवा करतो आहे. जनता ज्या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा आशीर्वाद देईल तेव्हा पुन्हा गोवर्धनी मातेचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईत येईन, असेही फडणवीस यांनी सांगितले. या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मी विरोधी नेते पक्षपदी आनंदी - फडणवीस

मी बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. मी विरोधीनेते पक्षपदी म्हणून आनंदी आहे. असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा: दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या त्याबाबत बोलायचे आहे - पंकजा मुंडे

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा आम्ही केलेल्या दबावामुळेच घेण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात आला असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.

हेही वाचा: 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

सरकारचं पॅकेज केवळ कागदावरच

राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी निर्णय घ्यावा. ठाकरे सरकारच्या (CM Uddhav Thackeray) सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

loading image
go to top