मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वास्थ्यासाठी फडणवीसांची प्रार्थना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वास्थ्यासाठी फडणवीसांची प्रार्थना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वास्थ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांना स्वास्थ लाभ व्हावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा: ''आजारी मुख्यमंत्री-आजारी सरकार'', नारायण राणेंची टीका

मुख्यमंत्र्यांवर नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांना स्वास्थ लाभ व्हावा. ते लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या राज्यात सरकार आहे की नाही हा प्रश्न आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात. या राज्यात चक्क सरकारला शोधण्याची वेळ आली आहे. आज जनता होरपळत आहे. त्याचा कोणी विचार करत नाही. इथं फक्त गांजा, हर्बल तंबाखू आणि दंगलीवर चर्चा होते, असं फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान दुखीचा त्रास होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांवर सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात काही काळ विश्रांती घेतली. तसेच आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

loading image
go to top