
बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा मी तिथं होतो - देवेंद्र फडणवीस
मुंबई : मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले. आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता.
आज रविवारी (ता.एक) फडणवीस हे मुंबई येथील बूस्टर डोस सभेत बोलत होते. या प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही टीका केली. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बिल्डर आणि बारमालकांचे कल्याण केल्याची टीका फडणवीस यांनी केले.
पोलखोल सभा १४ मे नंतर घेणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, अतुल भातखळखर आदी उपस्थित होते.