
छत्रपतींच्या गनिमी काव्याने हे नव सरकार आले : देवेंद्र फडणवीस
नागपूर : छत्रपतींच्या गनिमी काव्याने हे नवं सरकार आले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज मंगळवारी (ता.पाच) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते नागपूरमध्ये (Nagpur) आले आहेत. यावेळी फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाकडून त्यांची विजयी फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. (Devendra Fadnavis Says, This Government Come Into Power Using Chhatrapati Maharaj's Ganimi Kava)
हेही वाचा: एकनाथ शिंदे दिघेंना म्हणाले, मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल, युती तोडू नका
महाराष्ट्रात राज्य कोण चालवत होते हे कळत नव्हते. सर्वोत्तम राज्य बनवण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिला. जनतेच्या पाठिंब्यासाठी नेहमी ऋणात राहीन. पुढील अडीच वर्ष हे प्रगतीचे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जयहिंद, जय भारत अशा घोषणा फडणवीस यांनी दिल्या.
हेही वाचा: जितके निर्लज्ज बनला, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका
दोन दिवस राज्याच्या विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. सोमवारी (ता.चार) एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. दोन दिवसाचे अधिवेशन संपल्यानंतर फडणवीस हे आज नागपुरमध्ये आले आहेत.
Web Title: Devendra Fadnavis Says This Government Come Into Power Using Chhatrapati Maharajs Ganimi Kava
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..