जितके निर्लज्ज बनाल, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका | Vinod Kapri And Rajyavardhan Rathod | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajyavardhan Singh Rathore And Vinod Kapri News

जितके निर्लज्ज बनाल, तितके पुढे जाल; चित्रपट निर्मात्याची भाजपवर टीका

गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा भाजपशी असलेल्या संबंधावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. पकडण्यात आलेला दहशतवादी तालिब हुसेन याचे कोणतेही रेकाॅर्ड जवळ नाही. तो पक्षाचा पदाधिकारी नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावर भाजप (BJP) नेता आणि माजी केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केल्यावर चित्रपट निर्मात्याने त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Film Maker Vinod Kapri Attack On Rajyavardhan Singh Rathore Over His Comment)

हेही वाचा: नीना गुप्ता यांचे 'या' क्रिकेटपटूवर होते प्रेम, कुटुंबीयांकडून होता विरोध

राठोड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ज्यांचा पंतप्रधान दहशतवादी यासीन मलिकसाठी रेड कार्पेट टाकत होता, ज्यांच्या अध्यक्षा दहशतवाद्यासाठी आश्रू ढाळत होत्या आणि दहशतवादी देशभरात स्फोट घडवून आणत होते, जे शीख नरसंहारातील दहशतवाद्यांना वाचवत होते ते निर्लज्ज हात आम्हाला उपदेश द्यायला निघाले आहेत. जे दहशतवाद्यांचा खात्मा करुन देश सुरक्षित बनवत आहे. याचा समाचार घेताना चित्रपट निर्माता विनोद कापरी (Vinod Kapri) म्हणतात, हे योग्य आहे की भारतीय जनता पक्षात जितके निर्लज्ज बनाल, तितकेच पुढे जाल ! सर तुम्हाला हे सर्व करण्याची गरज नाही. तुम्ही देशाचा मानबिंदू आहात. कृपया हे सर्व गोळी मारो ठाकूर टाईपसाठी सोडून द्या. प्लीज !

हेही वाचा: राखी सावंत खूश ! आदिल दुबईत खरेदी करणार १० अपार्टमेंट्स

युपी काँग्रेस सेवादलाने लिहिले की दहशतवाद्यांशी संबंध भाजपचा असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्ञानाची गंगा उलटी वाहण्यासाठी खोटे प्रयत्न सुरु आहेत. राजस्थानमध्ये निवडणुका (Rajasthan Election) होणार आहेत. मात्र तुम्हाला मुख्यमंत्री बनवले जाणार नाही. खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी इतके टेंशन का घेतायत?

लोकांनाही घेतला समाचार

अमेशकुमार पाण्डेय नावाचे युजर लिहितात, भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व मर्यादा समाप्त होतात. ते सर्व समजत नाही. का समजून घेण्यासाठी आपली ऊर्जा नष्ट करत आहात. दुसरा युजर म्हणतो, काय चुकीचे लिहिले आहे? त्यांना यासीन मलिकबरोबर भोजन करण्यास लाज वाटली नाही, आम्ही सांगण्यापासून का घाबरावे ? देशात हुकूमशाही आणि विष पसरवणाऱ्या पक्षाचा नेता या प्रकारचे ट्विटच करु शकतो. भाजपचे सत्तेत येण्याचा अर्थ काय होतो, हे सर्व जनतेला कळत आहे, असे अजित यादव नावाचा युजर म्हणाला.

हेही वाचा: हृतिक अन् सैफचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात, रिलायन्स'कडून स्पष्टीकरण

जम्मू-काश्मीरच्या रियासीत रविवारी गावकऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना पकडले. त्यांच्याकडून २ एके सीरिज रायफल, ७ ग्रेनेट, एक पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत केला गेला. एक दहशतवादी तालिब हुसेन जम्मू प्रांतात भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचा आयटी आणि सोशल मीडिया सेल प्रभारीही बनवला गेला होता. यावरच सध्या वादाला सुरुवात झाली आहे.

Web Title: Film Maker Vinod Kapri Attack On Rajyavardhan Singh Rathore Over His Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top