धनुष्यबाण कोणाचा? यावर फडणवीसांचं मोठ विधान, म्हणाले, आम्हाला... | Devendra Fadnavis statement on Shivsena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadanvis press Conference In Pune

धनुष्यबाण कोणाचा? यावर फडणवीसांचं मोठ विधान, म्हणाले, आम्हाला...

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदारांना आपल्यासोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यातच आता शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमक कोणाचं असा पेच निर्माण झाला असून हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे. (Devendra Fadnavis news in marathi)

हेही वाचा: शिंदे, फडणवीस आता आरक्षण घालविल्याचे ढोल का बडवित नाहीत? एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनुष्यबाण नेमका कोणाचा याचा निर्णय निवडणूक आयोग करेल. दोन्हीकडचे दावे निवडणुक आयोगाकडे पोहोचले आहेत. मात्र आमचा पाठिंबा धनुष्यबाणासाहित शिंदे साहेबांना आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्यकडेच येईल, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

हेही वाचा: Eknath Shinde : मी मुलाखत देईन तेव्हा मोठा राजकीय भूकंप होईल, शिंदेंचा ठाकरेंवर निशाण

शिवसेना कोणाची याचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यानुसार दोन्ही बाजुने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी दावा केला होता की, निवडणूक आयोगाने आम्हाला पुरावे सादर करण्याचे पत्र दिले आहे. आम्ही निवडणूक आयोगासमोर आमची भूमिका मांडणार आहोत. आम्ही शिवसेना आहोत. आमचे 50 आमदार आणि लोकसभेत 2/3 सदस्य आमच्यासोबत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ''दुध का दुध पाणी का पाणी'', होईल असंही सावंत यांनी म्हटलं.

Web Title: Devendra Fadnavis Statement On Shivsena Symbol

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top