
Devendra Fadnavis Marathi News : महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊनही त्यात फडणवीसांच्या नावाबाबत शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळं मुख्यमंत्री नेमका कोण होणार? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.