esakal | फडणवीसांनी रात्री केली 'ही' पूजा अन् सकाळी घेतली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता. राजकीय घडामोडी टिपेला पोहोलच्या त्या रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केले आणि आहुतीही दिली.

फडणवीसांनी रात्री केली 'ही' पूजा अन् सकाळी घेतली शपथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी पूजा केल्याचे समोर येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

आज सकाळी भाजपने राज्यालाच नाही तर देशालाच एक राजकीय धक्का दिला. अजित पवार यांना सोबत घेऊन फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर, फडणवीस हे आपल्याकडे संख्याबळ असल्याचे सांगत  आहेत. 

अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता. राजकीय घडामोडी टिपेला पोहोलच्या त्या रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केले आणि आहुतीही दिली. माळव्यातल्या नलखेडा इथले माँ बगलामुखी मंदिरातले 4 पंडित हे खास अनुष्ठान करण्यासाठी आले होते. हे मंदिर तंत्र आणि इथली देवता तंत्रविद्येच्या पंडितांमध्ये लोकप्रिय आहे. या अनुष्ठानाने बगलामुखीचा आशीर्वाद मिळाला तर विजय निश्चित असतो अशी श्रद्धा आहे. फडणवीस यांच्या पूजेचा सध्याच्या त्यांच्या यशात वाटा आहे का, अशी चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

loading image