काकांशी बोलूनच अजित पवार आमच्याकडे आले होते : फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी शरद पवारांना कल्पना असल्याचे आम्हाला सांगितले, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच मुलाखत दिली. ते म्हणाले, 27 नोव्हेंबरला राजभवनावर शपथविधी होण्यापूर्वी अजित पवार हे आमच्याकडे आले. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणे शक्‍य नाही, असे मत मांडले. राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. स्थिर सरकार फक्त भाजपसोबतच देता येऊ शकते. कारण, त्यांच्याकडील आमदारांचा आकडा मोठा आहे, अशी भूमिका मांडली. यासंदर्भात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसोबत चर्चा केली होती, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील "मी पुन्हा येईन', ही घोषणा म्हणजे माझा गर्व नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत भाजपला अतिआत्मविश्वास नडला का, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "मी पुन्हा येईन' ही कवितेची साधीशी ओळ आहे. विधानसभेतील भाषणात मी त्याचा उल्लेख केला होता. लोकांना ही ओळ भावली आणि त्यामुळे ती सर्वत्र पसरली. "मी पुन्हा येईन'ला कुठेही गर्वाचा दर्प नव्हता. जनतेची सेवा करण्यासाठी "मी पुन्हा येईन', अशी माझी भावना होती.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर माध्यमांकडून भाजप हरलाय, असे चित्र निर्माण केले जात आहे. आम्ही 70 टक्के मते मिळवली आहेत. जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, 44 टक्के मते मिळवणारे एकत्र येऊन संख्याबळात आम्हाला मात दिली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com