
"हनुमान चलीसा म्हटलं तर कारवाई, पण.."; फडणवीसांचा आरोप
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (akbaruddin owaisi) यांनी जाहीरपणे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकादा तपालं आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटलं तर कारवाई केली जाते, पण काश्मीर तो़डण्याचा नारा देणाऱ्यावर कारवाई केली जात नाही असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई आहे. परंतु काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाही. शारजीलवर कारवाई नाही आणि अकबरुद्दीन ओवेसींना मी सांगू इच्छितो, औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन करून, तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या देशभक्त मुस्लिमांचा अपमान केला आहे.”असे फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे बोलताना फडणवीसांनी, “औरंगजेब या देशात हिंदूंचा तर नाहीच पण मुस्लिमांचा देखील नेता होवू शकत नाही. कारण या देशावर त्याने आक्रमण केलं होतं आणि ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना तडफडवूण त्यांची निर्घूण हत्या केली, अशा औरंगजेबाचं महिमामंडन आम्ही मान्य करणार नाही. त्यामुळे अशाप्रकारे जर त्याचं कोणी महिमामंडन करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.” अशी मागणी देखील त्यांनी केली.
हेही वाचा: अडवाणींवर कोणती कारवाई केली?; औरंगजेब कबर प्रकरणी काँग्रेसचा सवाल
फडणवीस पुढे म्हणाले की “छोट्या-छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे, लीलावतीतील एखादा फोटो ट्वीट झाला तर त्यावर कारवाई करणारे आता का गप्प आहेत? हा माझा सवाल आहे. त्यांनी कारवाई केली नाही तरी आम्ही हे सहन करणार नाही, याची जागा त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही.” असा इशारा देत उद्धव ठाकरे ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच नीती ते चालवत आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केला.
हेही वाचा: महागाईत कंपन्याचा अनोखा फंडा; पॅकेट्सची किंमत न वाढवताही नफ्यात
Web Title: Devendra Fadnavis Targeted Uddhav Thackeray Government Over Akbaruddin Owaisis Visit To Aurangzeb Tomb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..