

Loose Oil Sale Maharashtra Tukaram Mundhe Order dismiss devendra fadanvis
esakal
Maharashtra Loose Edible Oil Sale Allowed : राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात येणार आहे. या काळात विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार व्यावसायिकांना शासनाकडून सुविधा, मदत तसेच अनुदान किंवा सबसिडी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.