फडणवीस म्हणतात, फुटीरतावाद्यांना आता सरकारमध्येच वकील मिळाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

दिल्लीत जेएनयुतील हल्ल्याप्रकरणी मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एक युवती 'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन आल्याने यावरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.

मुंबई : फुटीरतावादी शक्तींना आता सरकारमध्येच त्यांचा वकील मिळाला. जयंतराव, अशा पद्धतीने व्होट बँकेचे राजकारण किमान तुमच्याकडून तरी अपेक्षित नाही, असे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दिल्लीत जेएनयुतील हल्ल्याप्रकरणी मुंबईत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एक युवती 'फ्री काश्मीर'चे पोस्टर घेऊन आल्याने यावरून फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. उद्धवजी, तुमच्या नाकाजवळ असे भारतविरोधी प्रकार कसे काय सुरु आहेत. यावर जयंत पाटील यांनी फडणवीसजी तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले, असा टोला मारला आहे.

देवेंद्रजी, तुम्ही सत्तेसह स्वनियंत्रणही गमाविले; जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

फडणवीस यांनी सरकारवर टीका करत म्हटले होते, की ‘तुमची दया येते! आता फुटीरतावादी वृत्तीला सरकारी वकील मिळाला. जयंतराव, हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही. काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे. फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत. सरकारमध्ये असो किंवा विरोधीपक्षात, आमचं एकच तत्त्व ‘राष्ट्र सर्वप्रथम’.

'फ्री काश्मीर'वरून फडणवीसांना संजय राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis tweet about free kashmir poster and targets Jayant Patil