26/11 हल्ला केवळ मुंबईवर नाही, तर.., देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना | Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devednra fadnavis

26/11 हल्ला केवळ मुंबईवर नाही, तर मानवतेवर झालेला हल्ला - फडणवीस

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (26-11 mumbai terrorist attack) आज 13 वर्ष पूर्ण होत आहेत.. याच दिवशी पाकिस्तानातून (pakistan) आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती..दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही 13 वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत..या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आदरांजली वाहण्यात येत आहे...भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोशल मिडियावर शहिदांना आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. काय म्हणाले फडणवीस?

26/11 हा केवळ मुंबईवर नाही, भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर झालेला हल्ला..

26-11...आजच्या दिवशी भ्याड आतंकवादी हल्ला झाला होता. जो सार्वभौमत्वावर हल्ला होता. या हल्ल्यादरम्यान मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी टार्गेट करण्यात आले होते. ज्याच्या आधारे केवळ मुंबईलाच नाही तर संपूर्ण आंतराष्ट्रीय समाजाला पराजित करण्याचं लक्ष्य होतं. ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता. तो कोणालाच विसरता येण्यासारखा नाही. २६-११ हल्ला जेव्हा झाला. तेव्हा नागरिकांनी संपूर्ण भारतावरील हल्ला मानला होता. यानंतर आंतराष्ट्रीय समाज देखील हेच मानतो, की हा हल्ला केवळ भारतातच नाही, तर परराष्ट्रात देखील अशाप्रकारे हल्ले होत आहेत. हा हल्ला मानवतेवर तसेच संपूर्ण आंतराष्ट्रीय समुदायावर होत आहे. आपल्या सर्वांना मिळून या विरोधात लढावं लागेल. आणि माझा विश्वास आहे, की यामुळे मानवता जिंकेल, आणि आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाही. याप्रसंगी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी आणि जनतेला नमन करतो.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणार; संजय राऊत

हेही वाचा: मोदी-योगींच्या 'त्या' व्हायरल फोटोचे रहस्य अखेर उलघडले! | Viral Photo

loading image
go to top