देवेंद्रजी, तुमच्यामुळेच ही वेळ आली!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 5 March 2020

दिल्लीतील साहित्यिक राजकारण्याची गरज
सुरुवातीलाच अजित पवार यांनी फडणवीस यांना ‘तुम्ही साहित्यिक होऊ शकता’, असा चिमटा काढत राजकारण सोडून साहित्यिक झाला तर आम्हालाही सुगीचे दिवस येतील, असा टोला लगावला. दिल्लीच्या राजकारणात उत्तम साहित्यिक आणि राजकारणी म्हणून तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही दिल्लीला जायला हवे, त्याचा २८८ आमदारांना आनंद होईल, असे म्हणत, सर्वांत जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, अशी मार्मिक टिपण्णी अजित पवार यांनी केली.

मुंबई - अर्थसंकल्पासारख्या विषयावर कधीही बोलण्याची वेळ येईल असे वाटलेही नव्हते; पण देवेंद्रजी तुमच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना लगावला. विधानभवनाच्या सेंट्रल  हॉलमध्ये देवेंद्र फडणवीस लिखित अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यात ठाकरे यांनी खुमासदार भाषण केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मला अर्थसंकल्पातील फार काही कळत नाही म्हणून, तुमचा मित्र म्हणून, तुम्ही माझ्यासाठीच हे सोप्या भाषेतील पुस्तक लिहिले असे मी मानतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थसंकल्पात सर्व लहान सहान बाबींचा उल्लेख करावा लागतो असे आपण म्हणता. मग नोटाबंदीसारख्या विषयाचा अर्थसंकल्पात उल्लेख असायला हवा की नको हे तुम्हीच सांगा, असा टोला ही ठाकरे यांनी लगावला. 

राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी

पुढील दहा वर्षे लिहीत राहा!
पुढील पाच ते दहा वर्षे तुम्ही अशाच प्रकारे सोप्या भाषेत अर्थसंकल्पावर लिहीत राहा, आम्ही समजत जाऊ, असे सांगत ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा संदेश दिला. 

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही फडणवीस यांना मार्मिक चिमटे काढत कोपरखळ्या मारल्या. 

बदलत्या हवामानाची डोकेदुखी; तापमानातील चढउतारामुळे पुणेकर हैराण

सर्वसामान्यांसाठी पुस्तक लिहिले
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी संधी असल्याचे सांगत दिल्लीला जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या कार्यक्रमात फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेला कळावा. सभागृहातील सर्व सदस्यांना त्यावर बोलता यावे म्हणून सोप्या भाषेतील हे पुस्तक काढल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार आशिष शेलार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra fadnavis uddhav thackeray book publish