'बहुत याराना लगता है!'; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
Congress Shared Devendra Fadnavis Video
Congress Shared Devendra Fadnavis Video Team eSakal

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी (MVA Government) आणि भाजपमध्ये (BJP) जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतललेल्या पत्रकार परिषदेनंतर आणखीच वातावरण ढवळून निघालं आहे. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबद्दल संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून आता महाविकास आघाडी आणि भाजपमधील आरोप प्रत्यारोपांची मालिका अत्यंत टोकाच्या थराला गेल्याची पाहायला मिळतेय. त्यानंतर आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Congress Shared Devendra Fadnavis Video
फडणवीस असं करणार नाहीत, एक दिवस लोक सोमय्यांची धींड काढतील - राऊत
Congress Shared Devendra Fadnavis Video
भुजबळांच्या बेनामी प्रॉपर्टीची पाहणी केल्यानं माझ्यावर गुन्हा; सोमय्यांचे ट्विट

बहुत याराना लगता है! म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात बसलेले दिसत आहेत.त्यांच्या आजूबाजूला काही लोकंही बसलेले आहेत. काही क्षणानंतर सुट-बुट आणि कोट घातलेली एक व्यक्ती फडणवीसांना येऊन भेटते. तेव्हा देवेंद्र फडणवीस उठून उभे राहतात आणि त्यांच्या हातात हात मिळवतात. ही व्यक्ती कोण आहे हे अद्याप समजू शकलेलं नसलं तरी, सचिन सावंत यांना काय सांगायचं आहे ते लवकरच स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

Congress Shared Devendra Fadnavis Video
"मेरा यही अंदाज..."; संजय राऊतांचा रोख कुणाकडे

"लोकशाहीवरील भाजपाचे गंडांतर पाहूनच लोकशाहीच्या संरक्षणासाठी मविआ सरकारची स्थापना झाली. हे सरकार पाडण्यासाठी मोदी सरकार तपास यंत्रणांचा नाझी SS सैन्याप्रमाणे वापर करत आहेत. सरकारच्या बदनामीसाठी मविआ नेत्यांचा भयंकर छळ चालू आहे. याविरोधात देशहितासाठी लढावेच लागेल. ते ही एकजुटीने..." असं म्हणत सचिन सावंत यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन दिलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com