देवेंद्र फडणवीसांची 'दिल्ली' वारी! मनसे-भाजप युतीवर खलबतं? | Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendra fadnavis

देवेंद्र फडणवीसांची 'दिल्ली' वारी! मनसे-भाजप युतीवर खलबतं?

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) राजधानी दिल्लीत पोहचले आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. फडणवीस-पाटील यांच्या दिल्लीवारीनंतर मनसे-भाजप (MNS-BJP) यांच्या युतीबाबत चर्चा रंगली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसह दिल्लीत पोहचले

आज शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीत पोहचले आहेत. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मनसे-भाजप युतीवर दिल्लीत खलबतं सुरु आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी (ता.२५) नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शाह यांना दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी या भेटीनंतर सांगितलं. तर, राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळतंय. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिल्याचे समजतेय.

हेही वाचा: मोदी-योगींच्या 'त्या' व्हायरल फोटोचे रहस्य अखेर उलघडले! | Viral Photo

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच या दोन्ही नेत्यांनी दिल्लीवारी केल्यामुळे दोन पक्षातील युतीवर आणखी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

loading image
go to top