भाविकांनी घेतला पंढरपूरचा निरोप

भारत नागणे
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पंढरपूर - 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता!' अशी भावना मनी धरत लाखो वारकऱ्यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरचा जड अंतःकरणाने शनिवारी निरोप घेतला. शुक्रवारी (ता. 11) कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी आपापल्या गावी जाण्यासाठी सकाळपासूनच एसटी स्थानक, रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी केली होती.

यंदा राज्याच्या सर्वच भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने कार्तिकी यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज होता. प्रशासनाने तयारीदेखील केली होती. परंतु, दशमी व एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची निराशा झाली. त्यातच पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. इतर राज्यांतून आलेल्या भाविकांचे यामुळे हाल झाले. त्यामुळे एकादशीच्या दिवशीच अनेक भाविकांनी परतीची तयारी सुरू केली होती.

देणगीतून मिळालेली रक्कम सील
कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांनी श्री विठ्ठल मंदिरातील देणगी पेट्यांमध्ये टाकलेली रक्कम मंदिर समितीने सुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली सील करून ठेवली आहे. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीने हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी सांगितले.
 
Web Title: Devotees took leave Pandharpur