ईडीची पीडा टाळण्यासाठी सभा, धनंजय मुंडेंची राज ठाकरेंवर टीका | Dhananjay Munde Comment On Raj Thackeray Sabha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde

ईडीची पीडा टाळण्यासाठी सभा, धनंजय मुंडेंची राज ठाकरेंवर टीका

परभणी : आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची औरंगाबाद बहुचर्चित सभा सायंकाळी होत आहे. त्यावर टीका होत आहे. राज ठाकरे यांची आजची सभा भाजप पुरस्कृत असून ईडीची पीडा टाळण्यासाठी ते सभा घेऊन भाजपला खूश करत असल्याची टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Raj Thackeray) यांनी केली. ठाकरे पूर्वी केंद्र सरकारविरोधात आणि आता महाविकास आघाडीविरोधात सभा घेत आहेत. त्याचा काहीही फरक पडणार नाही. मात्र स्वतःच काही तरी झाकण्यासाठी अशा सभांचं आयोजन केले जात असल्याचा टोला मुंडे यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला आहे. राज ठाकरे यांची सभा म्हणजे स्वतःच काहीतरी झाकण्यासाठी आहे. (Dhananjay Munde Criticize Raj Thackeray Sabha In Aurangabad)

आधी ठाकरे केंद्र सरकारविरोधात बोलत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरुन हटवले पाहिजे, अशी मागणी करणारा माणूस आज त्यांचेच गुणगाण गात आहेत. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. राज ठाकरेंची आज होत असलेली सभा भाजप पुरस्कृत आहे. ते काही नव्याने सांगण्याची गरज नसल्याचे मुंडे म्हणाले.

पुण्याहून औरंगाबादकडे रवाना

शनिवारी (ता.३०) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे औरंगाबादेत आगमन झाले. त्यांचे क्रांती चौकात स्वागत करण्यात आले. दुसरीकडे राजकीय संघटनांकडून ठाकरे यांच्या सभेला विरोधच होत आहे. शुक्रवारी रिपब्लिकन युवा मोर्चाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र खंडपीठाने सदरील याचिका फेटाळून याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड सुनावला. दुसरीकडे राज यांच्या सभेसाठी औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी १६ अटी घातलेल्या आहेत.