esakal | बीडमध्ये ११ वेळा ढगफुटी झाली, तेव्हा पंकजा मुंडे होत्या? धनंजय मुंडेंचा बहिणीवर पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

dhananjay munde-pankaja munde

'बीडमध्ये ११ वेळा ढगफुटी झाली, तेव्हा पंकजा मुंडे होत्या?'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. उभी पिकं पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकटे आणखी वाढले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) यांनी याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांना पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असा टोला मंत्री धनंजय मुंडे (minister dhananjay munde) यांना लगावला. यालाच आता धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा: बीड: अतिवृष्टीग्रस्त भागाची पंकजा मुंडेंनी केली पाहणी

बीडमध्ये अकरा वेळा ढगफुटी झाली. तेव्हा मी शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आम्ही कितीतरी रात्री जागून काढल्या. १२४ लोक वस्तीत अडकले होते. त्यांना बाहेर काढले. त्यावेळी पंकजा मुंडे कुठे गायब होत्या. त्या अनेक दिवस अमेरिकेत गेल्या होत्या. आज टीका करणे सोपे आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना बीडची परिस्थिती काय आहे ती लक्षात आणून दिली. कोल्हापूर आणि सांगलीपेक्षा मराठवाड्यातील परिस्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांच्या हातात काही नाही. चक्रीवादळ आणि सांगली पुरापेक्षा मराठवाड्यातील स्थिती गंभीर आहे. पंचनामे तरी कसे करणार. कारण एकाच पिकावर चारवेळा अतिवृष्टी झाली. आता शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? -

पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. जिल्ह्याच्या मदतीचे काय? मदतीच्या आश्वासनाचे काय? मुख्यमंत्री नक्की मदत करतील. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. केंद्राची मदत येईलच. सारखे एकमेकांना बोट दाखवणे योग्य नाही. मी जेव्हा खुर्चीवर होते तेव्हा लोकांसाठी काम केले असल्याचे मुंडे यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजना ही सकारात्मक योजना होती. त्यातून सर्व ठिकाणी चुकीची कामे झालेली नाहीत. शेतकऱ्यांच्या पाठीमागे राज्य शासनाने उभे राहिले पाहिजे. मी स्वतः बांधावर गेले आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यायला हवी. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षांत एक नवा पैसा आलेला नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली होती.

loading image
go to top