तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा? मित्रासाठी धनंजय मुंडेची भावूक पोस्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकायला असताना पहिल्या लेक्चरला भेटला पहिला मित्र तरुण वयात अनेक आठवणी ठेऊन आपल्यातून निघून गेला. अनंता तुला विसरण आणि हे दु:ख पचवणं कठीण आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय.

पुणे : राज्याचे सामाजिक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या महाविद्यालयातील मित्राच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भावनिक प्रतिक्रिया दिलीय. अॅड. अनंत पाटील नावाच्या मित्र आपल्यातून निघून गेला. हे दु:ख  पचवणं खूप कठीण आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय.

सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकायला असताना पहिल्या लेक्चरला भेटला पहिला मित्र तरुण वयात अनेक आठवणी ठेऊन आपल्यातून निघून गेला. अनंता तुला विसरण आणि हे दु:ख पचवणं कठीण आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय.  "तू याद बहुत आयेगा तो मै क्या करुंगा...?" असा प्रश्नार्थ भाव त्यांचे मित्राविषयचे प्रेम सांगून जातो.  

धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माविरोधात चौथी तक्रार समोर, रिझवान कुरेशींनीही दाखल केलीये FIR

अनंत पाटील यांचे आई-वडील, पत्नी आणि सर्व कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. तरुण वयात घरातील कर्ता व्यक्ती गेल्याचे दुःख पचवण्याची इश्वर कुटुंबियांना शक्ती देवो, अशी प्रार्थना करत धनंजय मुंडे यांनी अनंत पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

बलात्काराच्या आरोपानंतर विरोधकांनी केली होती राजीनाम्याची मागणी

काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार दिल्याने राज्यात एकच खळबळ माजली होती. रेणू शर्मा नावाच्या बॉलिवूड गायिकेनं त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याप्रकरणात अनेक मुद्दे समोर आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने धनंजय मुंडेंना अभय दिल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जनता दरबारच्या माध्यमातून आपल्या कामाचा धडाका पुन्हा सुरु केला आहे. सोशल मीडियावरील त्यांची मित्राविषयी लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhananjay munde emotional post for death college Friend Anant Patil