धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माविरोधात चौथी तक्रार समोर, रिझवान कुरेशींनीही दाखल केलीये FIR

धनंजय मुंडे प्रकरण : रेणू शर्माविरोधात चौथी तक्रार समोर, रिझवान कुरेशींनीही दाखल केलीये FIR

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेविरोधात आणखीन एक तक्रार दाखल झाली आहे. रेणू शर्माविरोधातील दाखल झालेली ही चौथी तक्रार समोर येतेय. जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनी रेणू शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्माने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप रिझवान कुरेशी यांनी केला आहे. रिझवान यांनी केलेल्या तक्रारीनंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आलाय. 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरोधात रिझवान कुरेशी यांनी आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. धनंजय मुंडे यांचं प्रकरण ताजं असताना भाजप नेत्यांही रेणू शर्मा विरोधात तक्रार दाखल केलेली. रेणू शर्माकडून वारंवार हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला असं भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते मनीष धुरी यांनीही रेणू शर्माकडून आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं माध्यमांसमोर स्पष्ट केलं. धनंजय मुंडे, कृष्णा हेगडे आणि मनीष धुरी यांच्यानंतर आता जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याचीही रेणू शर्मा विरोधातील तक्रार समोर आली आहे.

एकाच दिवशी रेणू शर्मावर चार जणांकडून आरोप लावले गेल्याने आता या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करणं महत्त्वाचं आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार रिझवान कुरेशी यांचं प्रकरण २०१८ ते २०१९ दरम्यानचे आहे. कशा पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून रेणू शर्माकडून फसवणूक केली जात होती त्याबाबतच्या FIR ची नोंद आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पोलिस कशाप्रकारे कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

दरम्यान, या सर्व तक्रारींनंतर रेणू शर्मा आणि त्यांचे वकील या प्रकारणांना, तक्रारींना कशा पद्धतीने उत्तरं देतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

dhanjay munde controversy fourth FIR against renu sharma revealed in front of media 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com