
Gopinath Munde Punyatithi: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज 3 जून रोजी 11 वा स्मृतिदिन आहे. परळीतील गोपीनाथ गडावर वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज गोपीनाथगडावर एकत्र येणार आहेत. मुंडे बंधुभगिनी तब्बल 11 वर्षांनी आज एकत्र दिसणार आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक भावनिक पोस्ट केली आहे.