
Dhananjay Munde: आमदार धनंजय मुंडेंनी पक्षाच्या मेळाव्यात हाताला काम द्या, अशी मागणी पक्षाकडे केली. त्यांची ही मागणी एकप्रकारे मंत्रिपदासाठी घातलेली गळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलाय. पक्ष त्यांना पुन्हा संधी देण्याच्या विचारात तर नाही ना? असंच नेत्यांच्या प्रतिक्रियेवरुन वाटू लागलं आहे.