
Dhananjay Munde Scam Marathi News: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळं संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आमदार सुरेश धस हे वारंवार हल्लाबोल करत आहेत. आता नव्यानं त्यांनी काही कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर करत पालकमंत्री असताना मुंडेंनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी थेट या पैशांच्या अपहाराचा पाढाच वाचला, त्यामुळं आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.