
Munde-Dhas Meet: भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्तपणे भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील असल्याचं समोर आलं आहे. पण धस आणि बावनकुळे हे दोघेही वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळं धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.