धनगर व मुस्लिम समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात 

धनगर व मुस्लिम समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात 

पुणे/औरंगाबाद - मराठा आरक्षणाची धग राज्यात तीव्र झाली असताना आता धनगर व मुस्लिम समाजानेही आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा सरकारला दिला आहे. 

सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याला चार वर्षे लोटली तरीही आरक्षण न मिळाल्याने समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्या; अन्यथा राज्यभरात उग्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी देण्यात आला. 

आरक्षणाबाबत आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पुण्यात आज झाली. ते म्हणाले, ""भाजप व शिवसेना सत्तेत आल्यानंतर एकाही मंत्र्याने आरक्षणाबाबत अवाक्षर काढले नाही. याउलट फडणवीस यांनी टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स या संस्थेचा अभ्यासगट समाजाच्या माथी मारला. आरक्षणाला टाळाटाळ करण्यासाठी हे एक षड्‌यंत्र आहे.'' 

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, त्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा आहे; मात्र मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा समाजातर्फे औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत आज देण्यात आला. जनजागरण समितीतर्फे आज आयोजित बैठकीत समाजातर्फे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. मागील सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयानेही शिक्षणात आरक्षण देण्याचा आदेश दिला होता. आता या सरकारने मुस्लिम समाजाच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नये, असा सूर या वेळी व्यक्त झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com