गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे हे छोटे नीरव मोदी : धनंजय मुंडे

मंगळवार, 17 जुलै 2018

राज्यात छोट्या नीरव मोदीचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे यांच्यावर केला आहे. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे म्हणजे छोटे नीरव मोदी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मयत शेतकऱयांच्या नावाने कर्जे उचलली असल्याचा आरोपही त्यांनी विधानपरिषदेत आज (मंगळवार) केला. 

नागपूर : राज्यात छोट्या नीरव मोदीचा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे यांच्यावर केला आहे. गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे म्हणजे छोटे नीरव मोदी असल्याचा आरोपही त्यांनी केला. मयत शेतकऱयांच्या नावाने कर्जे उचलली असल्याचा आरोपही त्यांनी विधानपरिषदेत आज (मंगळवार) केला. 

मुंडे म्हणाले, ''रत्नाकर गुट्टेंनी केलेला घोटाळा एकूण 7500 कोटी रुपयांचा आहे. एकूण 5500 कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱयांच्या नावाने उचलली आहेत. तब्बल 600 शेतकऱ्यांच्या नावाने ही कर्जे उचलण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धमकावून त्यांच्याकडून सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यांना धमकावून प्रकरणे दडपण्यात आली आहेत. सरकारने जर अशा व्यक्तींना पाठीशी घालत असेल तर हा व्यक्तीही नीरव मोदीप्रमाणे एक दिवस हा देश सोडून जाईल. जर डी. एस. कुलकर्णीवर कारवाई होऊ शकते तर रत्नाकर गुट्टेवर का होऊ शकत नाही. 

त्याचबरोबर, रिझर्व बँकेची परवानगी न घेता सर्व व्यवहार करण्यात आले असल्याचा आरोप विधानपरिषदेत धनंजय मुंडे यांनी केला. दरम्यान, रत्नाकर गुट्टे यांनी रासप पक्षाकडून 2014 ची विधानसभा निवडणुक लढवली होती.

Web Title: dhanjay munde alleged on ratnakar gutte