Supreme Court to Hear Shiv Sena Symbol Dispute on July 16 : दोन वर्षांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नाही. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असताना, ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्हासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.