

Dharashiv Sugarcane Farmers
esakal
Dharashiv sugarcane price : ऊसदराच्या प्रश्नावरून तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांचा संताप आता थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत धाराशिव जिल्ह्यातील ऊसदरात तब्बल ७०० ते ८०० रुपयांची तफावत का, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी ढोकी येथे खासदार व आमदारांच्या छायाचित्रांसह बॅनर लावले आहे. ‘ऊसदराच्या बाबतीत उत्तर द्या!’ असा थेट सवाल या बॅनरवर करण्यात आला आहे.