Dhule Mayor Mayadevi Pardeshi : धुळ्याच्या महापौरांचा विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न; पतीचा धक्कादायक खुलासा

Poisoning Claim : पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही बातमी अफवा असू शकते असे म्हटले असून, जिल्ह्यातील उद्योग विकासाविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आरोप केला आहे. संजय शर्मा यांच्या पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
Dhule Mayor Mayadevi Pardeshi Poisoning Claim

Dhule Mayor Mayadevi Pardeshi Poisoning Claim

esakal

Updated on: 

धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा आमदार अनुप अग्रवाल यांनी केल्यानंतर धुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, विविध राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, महापौरांनी विष प्राशन केल्याची बातमी अफवा असण्याची शक्यता असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...